अगदी परवाचीच गोष्ट . संध्याकाळी चहा घेण्यास बाहेर निघालो . हातात सवयीप्रमाणे मोबाईल. २१व्या शतकात मानवाच्या मूलभूत गरजा वाढल्या आहेत. तुम्हा-आम्हा सर्वसामान्याच्या हातात अगदी सहजपणे आढळतो . फक्त कोण त्याचा कसा वापर करून घेतो यावर ते अवलंबून असतं . (अर्थात मोबाईल शाप कि वरदान हा खूप मोठा विषय आहे ,त्यावर आज भाष्य नाही . )
चालत असतानाच मला कोणीतरी पाठी मागून आवाज दिला "ए दादा थांब ". अन एक मोपेड माझ्या बाजूला येऊन थांबली . साधारण तिशीतली एक महिला होती. सुरुवातीला मला समजले नाही . पण नंतर उमगले माझ्या हातातला मोबाईल पाहून त्यांनी मला थांबवलं . त्यांनी सुद्धा त्यांचा मोबाईल हातात घेत माझ्यापुढे केला . हे सारं घडत असतानाच मी त्यांच्याकडे पाहत होतो .( वस्तुतः आपल्या तथाकथित पुढारलेल्या समाजानेच तसले 'संकेत ' पाडले आहेत . कपाळावर कुंकू किंवा टिकली नाही म्हणजे -वैधव्य . )
एकंदरीत त्यांचा संसाराचा गाडा त्या एकट्याच हाकत होत्या . त्यांनी मला त्यांचा मोबाईल देत विचारलं . "कसलं तरी 'अकाउंट' येतय बघ यात. त्यामुळे माझं इंटरनेट चालू नाही होतेय अन मला व्हिडिओ बघता नाही येत
". मी मोबाईल हातात घेताच मला लक्षात आलं होतं काय झालय ते. अन लगेच इंटरनेट चालू देखील केलं. त्या लागलीच 'थँक्स ' म्हणाल्या .त्या पुढे बोलल्यात कि मला ब्लॉऊजच्या वेग-वेगळ्या डीझाईन बघायला लागतात . आता मात्र सारं चित्र स्पष्ट झालं होतं .
अकाली वैधव्य पदरी पडले म्हणून निराश न होता किंवा केवळ रडत न बसता 'ती ' उभी राहिली . तिच्या स्वताच्या पायावर . अन मी मनात हा विचार करत असतानाच नकळतपणे ' नतमस्तक ' झालो . अर्थात आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर खूप सार्या यशस्वी स्त्रियांबद्दल बोललं जाईल त्यांचं कौतुक होईल . पण समाजात 'तिच्या'सारख्या खूप सार्या स्त्रिया आहेत . योग्य पाठींबा न मिळाल्यामुळे मागे राहतात .
जर खरंच तुम्हाला 'महिला दिन ' साजरा करायचा असेल तर ज्या स्त्रिया केवळ साथ न मिळाल्यामुळे अन मार्गदर्शन न भेटल्यामुळे मागे राहतात त्यांना केलेली मदत खूप लाखमोलाची ठरेल .
दुनिया टपली आहे संपवण्यास तुला
तेव्हा खचू नकोस
अन्यायाविरुद्ध लढा दे तू
एका ठिणगीची मशाल हो तू
जीवन सर्वांचे उज्ज्वल करण्या
येति अखंड संकटे तुझ्या वाटी
घे हाती समशेर
दैत्याचा वध करण्या
शिक्षणाचा वसा घे हाती
ज्ञान सर्वांना वाटण्या
उभी राहा स्वताच्या पायी
हे सारे विश्व तारण्या
तुझ्याविन जग नाही हीच आजची 'प्रतिज्ञा'

मस्त
ReplyDeleteHappy womens day