डोळसपणा . . .
आज नासिकहून पुणे जात असताना संगमनेरला बसमध्ये २अंध व्यक्ती बसलीत. बसली कुठे तर फक्त उभी होती.खरं तर जागाच नव्हती . मी सहज विचारले कुठे जातायेत तर "पुणे"असं उत्तर भेटलं उच्छ्वास टाकून मी बाजूच्या मुलाला जागा करण्यास बोललो अन तो माझ्या बाजूला बसला तर त्याचा मित्र पुढच्या सीटवर.
माझे कुतुहल जागे झाले होते . मला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं होत. मग मी बोलत असता मला असेही समजले कि त्याचं फेसबुकवर "खातं" आहे. माझे हात नकळतपणे पुढे सरसावले अन बंद केलेलं इंटरनेट चालु केलं . मी त्याचं नाव अगोदरच ऐकलं होतं त्यामुळे फक्त आडनाव विचारले. पण सर्च मध्ये मला फक्त डोळस लोकं दिसत होती. मला त्याला सांगता पण येईना. तितक्यात त्याच्या खिशातून कसलासा आवाज आला. तर त्याने चक्क मोबाईल फोन काढला. हे मला सर्व अचंबित करणारे होते. माझ्या अंगाला अक्षरश: शहारे आले होते.
एव्हाना त्याचं फोनवरील संभाषण झालं होतं. तेव्हा तोच मला म्हणाला सापडत नसेल तर फोन नं. टाकून सर्च करा. त्याने त्याच्या आयुष्यातील कटू सत्य स्वीकारलं होतं . मी मग त्याला त्याच्या नावाप्रमाणे एक दोन प्रोफाईल वाचून दाखवल्या. त्याच्या महाविद्यालयाच नाव ऐकताच तो उदगरला " हेच आहे माझं ". अन त्याच्या चेहर्यावर एक विलक्षन स्मित झळकत होते तेव्हढच माझ्याही.
त्याने मला त्याच्या प्रोफाईलवर असलेल्या फोटोबद्दल विचारणा केली.कसा आहे ? कुठला आहे? त्याच्या मित्राने ते सर्व करून दिलेलं होतं त्याने पुढे जोडलं. मग मी त्याला संपूर्ण वर्णन करून बोललो. आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. मग मी कुतुहलाने त्याच्या फेसबुक टाईमलाईन वर जरा फेरफटका मारला. अन त्याला बोललो मागच्या महिन्यात तुम्ही मुंबई गेलेलात का तर तो थोडासा अचंबित झाला. त्याला वाटलं मला ते कसं समजलं असणार . त्याला कदाचित ते नवं होतं पण तो त्याचा वापर करतोय ह्याचा मला जास्त आनंद झाला होता. आता मला तो अंध असल्याचे कुठल्याच बाजूने वाटत नव्हते.त्याने काही जागाच ठेवली नव्हती. अन त्याने नेहमीप्रमाणे तिकीट देखील व्यवस्थित काढलं .
त्यांच्याबरोबर अजून काही सामान सुद्धा होते. मी त्याबद्दल विचारले असता त्याने मला सविस्तर माहिती दिली . खरं तर तो अन त्याची संपूर्ण टीम ऑर्केस्ट्रा चालवत होते. त्यांचा आज कार्यक्रम होता संगमनेरला. थोडक्यात दुसर्या कोणावर अवलंबून न राहता ते स्वताच त्यांचा उदरनिर्वाह करत होते.
तसं बघायला गेलं तर नकळतपणे "त्याने" मला आयुष्याकडे वेगळ्याच नजरेने बघण्याचा "दृष्टी"कोन दाखवला होता.