अप - स्पर्श
परवाच जागतिक महिला दिन मोठया दिमाखात पार पडला . सर्वीकडे महिलांच कौतुक करण्यात आलं , अन एक दिवसाचा सोहळा संपन्न झाला .
मी कामानिमित्त काही दिवस समीरवाडी , कर्नाटक येथे होतो . काल संध्याकाळी तेथून निघणे झाले . कोल्हापूर साठी शेवटची बस होती ६ वाजता . त्यामुळे तुंबळ गर्दी झाली होती बसमध्ये . तिकडे कर्नाटक मध्ये अजून सुद्धा ३x २ च्या आसन व्यवस्थ्येच्या बस आहेत , तरीसुद्धा बरेच लोकं उभी होती. नशिबात असल्यामुळे मला खिडकी जवळील सीट भेटली ( खूप कमी फळफळतं माझं नशीब ). आणि बाजूला एक मुलगी बसली . बहुदा कॉलेज जाणारी असावी , युनिफॉर्म होता . अन तसल्याच युनिफॉर्म मध्ये अजून काही मुले देखील होती . खूपच गर्दी असल्यामुळे बसायला मिळालं नव्हतं त्या मुलांना . पण बस पुढे जाताच त्या मुलीला अस्वस्थ वाटू लागलं , मला ते लगेच जाणवला म्हणून मी खिडकी जवळ सरकलो , तशी लागलीच तीपण सरकली . अन बाजूला उभा असलेला मुलगा देखील ....
आता मला तिची अस्वस्थता समजायला उशीर नव्हता लागला . मी त्या मुलाकडे एक कटाक्ष टाकला , त्यानेही माझ्याकडे पहिला . पण त्याच्या डोक्यात तेव्हा भलतेच विचार होते . बस जशी चालताना धक्के घेत चालत होती , तसे तोही बस मुळेच धक्के घेत शरीर हलवत होता , जणू काही तो जाणून बुजून काहीच करत नव्हता , अन ते सर्व आपोआप घडत होत.
त्या मुलीला अप-स्पर्श करण्याचा त्याचा प्रयत्न केव्हापासून चालूच होता . एव्हाना मी कानडी नाही हे त्या मुलीच्या लक्षात आलं असावं , म्ह्णून ती मला देखील काही बोलली नाही . अन मी देखील त्या मुलाला इच्छा असून काही बोलू शकलो नव्हतो . मी बोललेलं मराठी / हिंदी त्याने समजून न समजल्यासारखं केल असतं .
मग मी त्या मुलीलाच माझ्या जागेवर बसण्याचं इशार्याने सांगितलं . तस ती खिडकी जवळ बसली अन मी तिच्या जागेवर . तिच्या चेहऱयावर विलक्षण सुटकेचा एक निश्वास दिसत होता , तर त्या मुलाला देखील समजलं होत मी काय अन का केलाय ते !
शेवटी त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता . अन नंतर माझ्या असे लक्षात आले , कि रस्त्यात बरेच खड्डे , गतिरोधक असताना देखील त्या मुलाचा मला स्पर्श देखील झाला नाही ... आश्चर्य कारक .
त्या घटनेत माझा एक प्रयत्न होता कि त्या मुलीला जो काही अप-स्पर्श होत होता , तो रोखला गेला पाहिजे . अन मला त्याच समाधान होत कि तो यशस्वी झाला होता . नुसता एक दिवस महिला दिन साजरा करून पुरे आहे का ? स्त्रिया ह्या रोज सन्मानास पात्र नाहीत का ? मला जो अनुभव आला तसा अप-स्पर्श दररोज कोणीतरी अनुभवत असणार आहे . पण त्यातून त्यांची सुटका होते का ? किंवा हाच अप-स्पर्श वाढत जाऊन पुढे नको त्या घटना घडण्यास कारणीभूत ठरतो .
सध्या ह्या विषयावर खूप आहे बोलायला , लिहायला पण इतकाच मांडता येईल , जे काही वर्षांपूर्वी 'निर्भया ' हत्याकांड झालं होतं किंवा ' हिंगणघाट ' येथे झालेली घटना खूप क्रूर होती . जितका दोषी क्रूर कर्म करणारा आहे तितकाच दोषी त्या गुन्हेगाराला पाठीशी घालणारा नाहीये का ?किंवा तितकाच दोषी , समोर घटना घडत असताना देखील फक्त बघ्याची भूमिका घेणारा नाहीये का ? आजकाल घटना घडल्यानंतर तिचा व्हिडीओ व्हायरल करण्यात धन्यता मानणारी लोक जास्त दिसताय . किंवा गुन्हा सिद्ध होऊन देखील कायद्याच्या पळवाटा शोधून त्यांना फक्त काही पैस्यां करीता वाचवणारी मानसिकता आहे .
हे कुठेतरी थांबायला हवं किंबहुना थांबवायला हवं ... नाहीतर रोज कोणीतरी असा अप-स्पर्श करत राहील अन पुढे त्याच अप-स्पर्शच रूपांतर वाईट घटनेत होईल . तिथे जोपर्यन्त स्वतःच्या घरातली स्त्री नसेल तोपर्यन्त हे असेच चालू राहणार का ???

एका महतत्वाच्या विषयाला साद घातला आहेस तुषार, आणि आज ते फार गरजेचे ही आहे. सुंदर तुझी कृती आणि लेख ही.
ReplyDelete